karjmafi yojana list 2022

Shetkari Karmafi Anudan (50000) | नियमित कर्जमाफी अनुदान २०२२ | असे चेक करा तुमचे यादीतील नाव

Shetkari Karmafi Yojana 2022 : महात्मा ज्योतीराव फुले कर्ज माफी योजने अंतर्गत कर माफी ची घोषणा करण्यात आली होती.या योजने अंतर्गत २०१७ ते २०१८ , २०१८ ते २०१९ व २०१९ ते २०२० या तिन्ही वर्षी ज्या शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड केलेली आहे अश्या शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत ५०००० पर्यंत अनुदान थेट त्यांचा बँक खात्या मध्ये जमा करण्यात येणार आहे.या योजने मध्ये ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जाची परतफेड केलीय त्यांच्या साठी हि खुशखबर आहे.या ५०००० अनुदान कर्जमाफी योजनेच्या यादीमध्ये तुमचे नाव कसे चेक करायचे ते या लेख मध्ये आम्ही सर्विस्तर माहिती दिलेली आहे, ती वाचून तुम्ही या यादीत तुमचे नाव आहे कि नाही हे तुम्ही पाहू शकता. चला तर मग जाणून घेऊया.

असे पहा तुमचे यादीतील नाव

कर्जमाफी योजनेच्या यादी मध्ये तुमचे नाव आहे कि नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटर म्हणजेच CSC सेंटर मध्ये जाऊन पाहावे लागेल. तिथे तुम्हाला जिल्ह्यानुसार तालुक्यानुसारयादी तुम्हाला पाहता येईल.या योजनेविषयीची यादी पाहायची असल्यास तुम्हाला तुमचे आधार कार्ड नंबर ची गरज भासेल.अश्या पद्धतीने तुम्ही तुमचे नाव पाहू शकता.

या योजनेची कार्यपद्धती

  • आपला आधार क्रमांक बँकेच्या, विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या कर्जखात्याशी संलग्न करावा.
  • मार्च २०२० पासून बँकांनी आधार क्रमांकासह आणि कर्ज खात्याच्या रकमेसह तयार केलेल्या याद्या सूचनाफलक तसेच चावडीवर प्रसिद्ध केल्या जातील.
  • या याद्यांमध्ये शेतकऱ्याच्या कर्जखात्याला विशिष्ट ओळख क्रमांक दिलेला असेल.
  • शेतकऱ्यांनी आधार कार्डासोबत आपल्याला दिलेला विशिष्ट ओळख क्रमांक घेवून ‘आपले सरकार सेवा’ केंद्रात जावून आपल्या आधार क्रमांकाची आणि कर्ज रकमेची पडताळणी करावी.
  • पडताळणी नंतर शेतकऱ्यांना कर्ज रक्कम मान्य असल्यास नियमानुसार कर्जमुक्तीची रक्कम कर्जखात्यात जमा होईल.
  • कर्ज रकमेबाबत व आधार क्रमांकाबाबत शेतकऱ्यांचे वेगळे म्हणणे असल्यास ते जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीसमोर मांडले जाईल. समिती त्याबाबत निर्णय घेऊन अंतिम कार्यवाही करेल.

या योजनेविषयीची माहिती या खालील विडिओ मध्ये पाहू शकतो

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *